करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील शेलगाव येथील रोहित शंकर बेरे यांची भारतीय सैन्य दलात प्रथम क्रमांकाने निवड नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल तालुक्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी रोहित यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

लहानपणापासूनच सैन्याची आवड असलेल्या रोहित यांनी कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. शेलगावचे सरपंच तसेच सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक प्रमोद( बाळू) बेरे यांचे ते पुतणे असून शंकर बेरे यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत.

रोहित यांच्या या यशाबद्दल पांगरे येथील संतोष (बापू )पाटील व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. याशिवाय शेलगाव पंचक्रोशीतील विविध स्तरातून रोहित यांचे अभिनंदन होत आहे.

.

.

.

.

.

