करमाळा शहर विकास आघाडीला बळकटी
करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच ‘एकला चलो रे’ भूमिका घेतलेल्या सावंत गटाच्या करमाळा शहर विकास आघाडीला सामान्य जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच सावंत गटात दिग्गजांच्या प्रवेशाचा ओघही सुरूच आहे. शनिवारी सायंकाळी शहरातील भीम नगर येथील माजी नगरसेवक मुकुंद कांबळे आणि अमोल जाधव यांनी समर्थकांसह सावंत गटात प्रवेश केला आहे.

आतापर्यंत माजी नगरसेवक मुकुंद कांबळे हे बागल गटाशी संलग्न तर अमोल जाधव हे जगताप गटाचे कट्टर समर्थक मानले जात होते. आपापल्या नेत्यांशी प्रामाणिक राहूनही कार्यकर्त्यांची कदर केली जात नसल्याने अनेक समाज बांधवांच्या आग्रहास्तव सावंत गटाशी हात मिळवणी केल्याचे यावेळी कांबळे आणि जाधव यांनी सांगितले आहे.

यावेळी करमाळा शहर विकास आघाडीचे नेते सुनील सावंत, माजी नगरसेवक संजय सावंत, माजी नगरसेवक रवींद्र कांबळे, करमाळा शहर विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार पुष्पा प्रदीप शिंदे आणि जनाबाई रवींद्र कांबळे यांच्यासह भीम नगर येथील अनेक महिला भगिनी आणि समाजबांधव उपस्थित होते.

.

.

.

.

.

.
