करमाळा, प्रतिनिधी – शहरातील दत्तपेठ येथील श्रीदत्त मंदीरात सालाबादप्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती या खाजगी श्रीदत्त मंदीराचे मालक ॲड. दत्तात्रय त्रिंबक देवळे यांनी दिली आहे.

गुरुवार दि. ०४/१२/२५ रोजी सकाळी नृसिंह सरस्वती एकमुखी दत्तात्रय लघुरूद्राभिषेकानंतर सकाळी १०.४५ ते दु. १.१५ या वेळेमधे कीर्तन विशारद, कीर्तन कमलिनी ह.भ.प. सौ. मयुरी घेवारी (चिंचवड, पुणे) यांचे श्री दत्तात्रय जन्माचे होणार आहे. त्यानंतर श्रीदत्त -जन्म सोहळा पार पडणार आहे. तसेच शुक्रवार दि. ५/१२/२५ रोजीही सकाळी १० ते दुपारी १२ या दरम्यान ह.भ.प. सौ. मयुरी घेवारी यांचे कीर्तन व त्यानंतर दहिहंडी आणि समाप्तीचे कीर्तन होणार असल्याचे ॲड. देवळे यांनी सांगितले आहे.

श्री दत्त जयंती निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रम आणि त्यानंतर शुक्रवारी दुपारी १२.३० ते दुपारी ३ या वेळेत होणाऱ्या प्रसाद वाटपाचा शहरातील सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन ॲड. देवळे यांनी शेवटी केले आहे.

.

.

