करमाळा, प्रतिनिधी – शहरातील बारा बंगले येथील रहिवासी सौ. मंगल सोमनाथ चिवटे यांचे काल बुधवार दि. ०३/१२/२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्यांची अंत्ययात्रा आज गुरुवार दि.०४/१२/२५ रोजी सकाळी दहा वाजता बारा बंगले येथील निवासस्थानापासून निघेल आणि शहरातील महावितरण कार्यालयाच्या बाजूला असलेल्या लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
