March 1, 2026
कार दुचाकी ॲक्सीडेंट

कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
करमाळा , प्रतिनिधी – पुढे असलेल्या चारचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारचालकाने समोरुन येणा-या दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीवरील महीलेचा मृत्यू झाला आहे. शनीवार दि.२९/११/२५ रोजी करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावर हा अपघात झाला होता.

याबाबत कुर्डूवाडी रेल्वे पोलिसात नेमणूक असलेले मयूर भारत कदम (वय-२७, रा. सालसे, ता.करमाळा) यांनी दि.०३/१२/२५ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२९/११/२५ रोजी सकाळी १०.०० वाजण्याच्या सुमारास ते दुचाकी क्र. एम.एच.४५ बी सी २५७२ वरुन पत्नी ऐश्वर्या मयुर कदम (वय-२१) यांच्यासह सालसे येथे आई-वडिलांना भेटून परत जेऊरकडे जात होते. यावेळी करमाळा-कुर्डुवाडी रोडवरील आळसुंदे शिवारात अशोक घाडगे यांच्या ढाब्याच्या बाजुच्या रोडवर नेक्सॉन कार क्र. एम एच २३ बी एन १५९२ वरील चालकाने त्याच्यासमोर जात असलेल्या इको कारला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या कदम यांच्या मोटार सायकलला समोरून जोराची धडक दिली. या धडकेमुळे कदम व त्यांच्या पत्नी ऐश्वर्या हे दोघे मोटार सायकलसह खाली पडले. यावेळी मयूर यांच्या उजव्या हातास आणि डोक्याला जखम झाली तर ऐश्वर्या यांच्या सर्वांगाला जबर मार बसून त्या बेशुद्ध पडल्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी जखमी मयूर व ऐश्वर्या यांना खाजगी वाहनातून बार्शी येथील भगवंत हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता ऐश्वर्या या उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मयूर कदम यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी कारचालक शुभम बाबासाहेब जिवे (रा. शिरापूर ता. आष्टी जि. बीड) याच्यावर गुन्हा नोंद केला असून पोलीस उपनिरीक्षक अभिमान गुटाळ हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *