March 1, 2026
IMG-20251222-WA0067

महीलेच्या पतीसह तिघांवर करमाळ्यात गुन्हा दाखल…

करमाळा, प्रतिनिधी – इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या महिलेला भेटण्यासाठी जाणे एका तरुणाला महागात पडले आहे. करमाळा शहराच्या पश्चिमेला असलेल्या जवळच्या गावामधील महिलेच्या पतीसह तिघांनी या तरुणाला मारहाण केली आहे.

याबाबत करमाळा-जामखेड दरम्यान करमाळ्यालगत असलेल्या मात्र जामखेड तालुक्यात मोडणाऱ्या गावातील प्लंबिंगचे काम करणाऱ्या तरुणाने करमाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, करमाळा शहराच्या पश्चिमेला असलेल्या गावातील एका महीलेशी त्याची इंस्टाग्रामवरुन ओळख झाल्यानंतर गेल्या महिनाभरापासून त्यांच्यात फोनवर बोलणे चालू होते. दरम्यान दि.२०/१२/२५ रोजी त्या महिलेने फिर्यादी तरुणाला तिच्या गावी भेटण्यासाठी बोलविले होते. दुपारी एक वाजता तो तिच्या घरासमोर थांबला असता त्या महिलेच्या पतीने ‘माझ्या पत्नीची छेड काढतो काय’ असे म्हणत त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत खाली पाडले. यावेळी तिथे असलेल्या इतर दोघांनीही फिर्यादी तरुणाला रबरी पाईपने डोक्यात, तोंडावर, पाठीवर मारुन जखमी केले.

सदर तरुणाच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी महिलेच्या पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार दीपक घोरपडे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *