March 1, 2026
IMG-20251230-WA0080

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील गुळसडी येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे ग्रामदैवत तसेच जागृत देवस्थान हजरत संत ताजुद्दीन बाबा यांच्या उरुसाला येत्या एक जानेवारीपासून म्हणजे गुरुवार पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती ताजुद्दीन बाबा दर्गाह ट्रस्टने दिली आहे.

उरुसाच्या निमित्ताने गुरुवार दि. १ रोजी गावातून संदलची मिरवणूक निघणार असून शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मुख्य संदलची मिरवणूक निघणार आहे. यामध्ये बाबांची चादर तसेच मानाच्या घोड्याची सवाद्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत वैजापूर येथील सुप्रसिद्ध बँड वादक हबीब चाऊस हे बँडच्या माध्यमातून आपली कला सादर करणार आहेत. मिरवणुकीनंतर लंगर खाना म्हणजे महाप्रसादाचे वाटप दर्गाह पटांगणावर होणार आहे. ऊरूसाच्या रात्री ९ वाजता दर्गाह पटांगणावर कव्वाल अब्दुल हबीब अजमेरी यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे.

गुळसडी येथील ग्रामदैवत हजरत संत ताजुद्दीन बाबा यांच्या ऊरूसानिमित्त होत असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन गुळसडी येथील समस्त ग्रामस्थ तसेच उर्स पंच कमिटीने केले आहे.

गुळसडी गावात हिंदू मुस्लिम एकात्मतेचे आगळेवेगळे दर्शन,,,,,,

गुळसडीचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात तर ताजुद्दिन बाबा यांच्या उरूसा निमित्त होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये गावातील सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावतात. दोन्ही यात्रां दरम्यान गुळसडी येथे हिंदू मुस्लिम एकात्मतेचे आगळे-वेगळे दर्शन पहावयास मिळते.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *