करमाळा , प्रतिनिधी – मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत करमाळा शहरातील श्री गिरधरदास देवी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. विभा विलास आलदर हीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. विभाच्या या यशाबद्दल प्रशालेकडून तिचे अभिनंदन करण्यात आले.

आष्टी (ता.मोहोळ, जि. सोलापूर) येथे दि.२५ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय सिल्वर ओक मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या कु. विभा विलास आलदर हिने ३००० मीटर धावण्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. याबद्दल तिला रोख दहा हजार रुपये ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

कु. विभाच्या या घवघवीत यशाबद्दल प्रशालेचे अध्यक्ष कन्हैयालाल गिरधरदास देवी, सचिव अमोदशेठ संचेती, चंद्रकांत देवी, विजयकुमार दोशी, खजिनदार सौ.सुनीता देवी यांच्यासह मुख्याध्यापक संभाजी जगताप, क्रीडा शिक्षक जितेंद्र शिंदे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

.

.

