March 1, 2026
IMG-20260117-WA0016(1)

करमाळा, प्रतिनिधी – जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोर्टी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने संधी मिळाल्यास निवडणूक पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचा विश्वास करमाळा तालुक्यातील पोमलवाडी येथील मीनाक्षी सूर्यकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख तसेच मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व मार्केट कमिटीचे माजी संचालक सूर्यकांत पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.

याबाबत सविस्तर बोलताना सौ.मीनाक्षी पाटील यांनी सांगितले आहे की, यापूर्वी शिवसेनेच्या चिन्हावर त्यांनी कोर्टी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले होते. त्यांचे पती सूर्यकांत पाटील यांनीही करमाळा विधानसभा शिवसेनेच्या चिन्हावर लढवली होती आणि त्यातही त्यांना मोठ्या प्रमाणावर मताधिक्य घेतले होते. त्यांचे सासरे पोपटराव पाटील यांनी करमाळा पंचायत समितीचे अकरा वर्षे उपसभापती म्हणून काम पाहिलेले आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहता त्यांचा कोर्टी जिल्हा परिषद गटात दांडगा जनसंपर्क असून काम करण्याची तळमळ, सामाजिक बांधिलकी, समाज सेवा करण्याची तळमळ आहे. त्यांचे चिरंजीव संग्राम सूर्यकांत पाटील यांनी सुद्धा पोमलवाडी गावचे बिनविरोध सरपंच म्हणून काम केले आहे. त्यामुळे कोर्टी जिल्हा परिषद गटातून त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

कोर्टी गटातून सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार तसेच भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या माध्यमातून जिल्हा पातळीवरून प्रभावितपणे काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास मीनाक्षी पाटील यांनी व्यक्त केला आहे. जनतेच्या प्रश्नासाठी सदैव उपलब्ध राहत विकास कामांना प्राधान्य दिले जाईल, असेही सौ.पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *