March 1, 2026
IMG-20260118-WA0070

मोठ्या शक्ती प्रदर्शनासह उमेदवारीची केली मागणी

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील नेरले येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. नागनाथ उर्फ नाना माणिक कारंडे यांनी रविवार दि.१८ रोजी आपल्या शेकडो समर्थकांसह मा.आ. संजयमामा शिंदे गटात प्रवेश केला आहे. ॲड. कारंडे हे पांडे गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

सर्वसाधारण परिवारात जन्मलेल्या ॲड. कारंडे यांना सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याचे आवड आहे. वकिली पेशासह कोरोना काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप, संपर्कातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्धीसाठी प्रयत्न, गरजवंतांना शासकीय योजना कर्ज प्रकरणे आधी सवलतींसाठी मार्गदर्शन व त्या मिळवून देण्यासाठी पाठपुरावा अशा सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान असते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ याच सामाजिक जाणीवेच्या आधारावर त्यांचे बंधू आबासाहेब कारंडे हे नेरले ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले असून त्यांची कारकीर्दही समाधानकारक आहे.

ॲड. कारंडे यांना असलेल्या या सामाजिक भावनेची जाण ठेवून त्यांच्या समर्थकांकडून पांडे गणातून पंचायत समितीची जागा लढवण्याचा आग्रह होत आहे. याच आग्रहामुळे आणि मा.आ. संजयमामा शिंदे गटाच्या करमाळा आणि भिलारवाडी येथील मेळाव्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता ॲड.कारंडे यांनी मा.आ. शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या समर्थकांनीही त्यांच्या निर्णयाला दुजोरा देत मोठ्या संख्येने निमगाव (टें) येथे उपस्थित राहून मा.आ. संजयमामा शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेशावेळी मा.आ. शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन ॲड.कारंडे यांचा सत्कार केला.

यावेळी श्रीदेवीचा माळ येथील श्रीराम फलफले, अनिल पवार, पप्पू हिरगुडे, अनिल शिंदे, सुमित पवार, दयानंद पवार, पांडे येथील ज्ञानदेव क्षीरसागर, आजिनाथ कांबळे, संजय तेली, नागनाथ राऊत, खांबेवाडी येथील राहुल चोरमुले, सतीश नरुटे, मेजर शंकर कोळेकर, बोरगावचे विनय ननवरे, जयदीप ननवरे, तरटगाव येथील तात्यासाहेब पाटील, आळजापूर येथील ज्ञानेश्वर रोडे, बाळेवाडी येथील डॉ. सुभाष शेंद्रे, किशोर नलवडे, अशपाक जमादार,

पोथरे येथील धनंजय शिंदे, शहाजी झिंजाडे, भाऊसाहेब भांड, राजेंद्र हिरडे, ईश्वर झिंजाडे, बिटरगाव (श्री) बबन मुरूमकर, येथील पाडळी येथील सतीश पाटील, किसन पिंपरे, गौतम ढाणे, पोटेगाव येथील लालासाहेब भागडे, भैय्या भागडे, वाघाची वाडी येथील देविदास वाघ, दादा वाघ, नाना हिरगुडे, शहाजी गाढवे, दिलमेश्वर येथील नितीन मोरे, दत्तू मस्के, रणजीत बिरगळ यांच्यासह पांडे गणातील सर्व गावांतील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *