करमाळा, प्रतिनिधी – जेऊर-टेंभुर्णी रस्त्यावरील लोकविकास डेअरी लगत असलेल्या पुलावर ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा जाग्यावरच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवार दि.३० रोजी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

या अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार करमाळा तालुक्यातील भाळवणी येथील मच्छिंद्र सोपान काळे (वय-३८) हे त्यांच्या मेहुण्याचा मुलगा शंकर दत्तू पवार (वय-१८ वर्षे, रा. पारेवाडी, ता.करमाळा) याच्यासह दुचाकी क्रमांक एम.एच. ४५ ए के ६१७४ वरुन कंदर कडे निघाले होते. दरम्यान जेऊर-टेंभुर्णी रस्त्यावर असलेल्या लोकविकास डेअरी नजीकच्या पुलावर ट्रक क्र. के ए २५ ए ए ४३३६ आणि काळे यांच्या अपघात झाला. या अपघातात काळे यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे असलेल्या शंकर पवार यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.

या अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही करत काळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला तर पवार याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

.

.

.

