March 1, 2026
IMG-20260210-WA0053

करमाळा, प्रतिनिधी – खाजगी बस मधून प्रवास करणाऱ्या परराज्यातील अल्पवयीन मुलीवर बसमधीलच एकाने अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार करमाळा तालुक्यात उघडकीस आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी महिला व तिचे कुटुंब दि. 09/02/2026 रोजी रात्री 09/35 वाजण्याच्या दरम्यान गाडीतून प्रवास करत होते. यावेळी त्यांची गाडी करमाळा ते टेंभुर्णी रस्त्यावरील करमाळा तालुक्यातील पांगरे गावाच्या शिवारात आली असताना फिर्यादीची मुलगी निर्भया (नाव बदललेले) वयः 9 वर्षे, हि पाणी पिणेकरीता गेली होती. त्यानंतर ती काही वेळ झाला तरी आली नाही. त्यामुळे फिर्यादी महीलेने तिच्या पतीला मुलगी निर्भया पाणी पिऊन आली नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या पती बसमध्ये शोध घेतला असता बसमधीलच एकाने मुलगी निर्भया याच्यावर अत्याचार केल्याचे निदर्शनास आले.

सदर फिर्यादीवरून आरोपी जेठाराम धनाराम जाट चौधरी (वय 36 वर्षे रा.खरीयाली नाडी, बाडनेर, राजस्थान) याच्यावर पोलिसांनी बालकांचे लैगींक अपराधांपासून संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक ढोरे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *