करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील श्री देवीचामाळ येथील ऐश्वर्या शिवशंकर फुलारी-वाघमारे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कृषी अधिकारी (वर्ग-२) या पदावर निवड झाली आहे. ग्रामीण भागातील तरुणीची या पदावर निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

ऐश्वर्या फुलारी यांचे प्राथमिक शिक्षण करमाळा शहरातील नवभारत इंग्लिश स्कूल येथे तर दहावीपर्यंतचे शिक्षण करमाळा येथीलच कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयामध्ये झाले आहे. यानंतर लातूर व पुणे येथे बीएससी ॲग्री पूर्ण केले आहे.

सुरुवातीपासूनच अत्यंत हुशार असणाऱ्या ऐश्वर्या यांनी चिकाटीने आणि परिश्रमाने हे यश संपादन केले आहे. याबद्दल नवभारत इंग्लिश स्कूलच्या संचालिका सौ. सुनिता कन्हैयालाल देवी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

.

.

