करमाळा, प्रतिनिधी – वेगवेगळ्या ऑफर्सच्या माध्यमातून आणि बजाज फायनान्सच्या साथीने सर्वाधिक विक्री घडवून आणल्याबद्दल शहरातील बनशंकरी मोबाईल शॉपीचे बसवराज चिवटे हे बजाज फायनान्सचे “धुरंधर” ठरले आहेत. बजाजच्या करमाळा शाखेच्या वतीने शुक्रवार दि.१३ रोजी चिवटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्वसामान्य ग्राहकांना महागड्या वस्तू घेण्यासाठी आर्थिक सहकार्य आवश्यक असते. बजाज फायनान्सच्या वतीने आणि शहरातील दुकानदारांच्या माध्यमातून ग्राहकांची ही गरज नाममात्र कागदपत्रांत आणि केवळ काही मिनिटांमध्ये पूर्ण केली जाते. त्यामुळे बजाज फायनान्सचे वित्त सहाय्य ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र केवळ ग्राहकांसाठीच नव्हे तर विक्रेत्यांसाठीही बजाज फायनान्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रोत्साहनपर ऑफर राबविल्या जातात. याच धोरणातून दि.१ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत मध्ये सर्वाधिक वित्त प्रकरणे (फाईल्स) करणाऱ्या विक्रेत्याला बजाज कडून “धुरंधर” पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

वेगवेगळ्या ऑफर्सच्या माध्यमातून सर्वाधिक विक्री घडवून आणण्यात अग्रेसर असलेली करमाळा शहरातील श्री बनशंकरी मोबाईल शॉपी हे तालुक्यातील ग्राहकांसाठी एक विश्वासू मोबाईल शॉपी आहे. त्यामुळे मोबाईल खरेदीवेळीच्या योग्य मार्गदर्शन आणि सुयोग्य ऑफर साठी ग्राहकांचा बनशंकरी मोबाईल शॉपी कडे विशेष ओढा असतो. बनशंकरी मोबाईल शॉपीचे प्रोप्रायटर बसवराज चिवटे यांच्यासह शॉपीतील संपूर्ण स्टाफ हा सुद्धा ग्राहकांना सेवा देण्यासाठी तप्तर असतो. याच तप्तरतेतून जानेवारी महिन्यात बजाजकडून जाहीर करण्यात आलेला धुरंधर किताब मिळवण्यासाठी बनशंकरी मोबाईल शॉपी कडून सर्वाधिक फाईल करण्यात आल्या आणि बनशंकरी मोबाईल शॉपीचे बसवराज चिवटे हे करमाळा शहरातील बजाज फायनान्सचे धुरंधर ठरले.

शुक्रवारी बजाज फायनान्सचे करमाळा हेड अजित यादव यांच्या हस्ते आणि ब्रॅंच मॅनेजर वैभव तळेकर आणि श्री बनशंकरी मोबाईल शॉपीचे मार्गदर्शक शिवराज (भाऊ) चिवटे यांच्या उपस्थितीत बनशंकरी मोबाईल शॉपीचे प्रोप्रायटर बसवराज चिवटे यांना “धुरंधर” ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यावेळी श्री बनशंकरी मोबाईल शॉपीच्या कार्यतत्पर स्टाफचे युवराज जगताप, अभिजीत पिसे, सागर सांगळे आणि सौरभ कानगुडे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या यशामुळे बनशंकरी मोबाईलचे सर्वत्र कौतुक होत आहे.

.

