शुभारंभा निमित्त “फ्री भेळ”
करमाळा, प्रतिनिधी – शहरातील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे प्रसिद्ध “दत्त भेळ” आता करमाळ्यात सुरू होत आहे. १९७८ पासून चविष्ट भेळ व विविध चटपटीत पदार्थांसाठी उत्तम चवीची ओळख असलेला इचलकरंजी येथील हा ब्रँड आशिष वसंत न्हावकर यांच्या माध्यमातून करमाळकरांच्या सेवेत रुजू होत असून रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ५.३० वाजता “दत्त भेळ”च्या करमाळा शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ होणार आहे.

मुंबई मंत्रालयातील पर्यटन विभागाचे कक्ष अधिकारी मा. संदीप कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्री स्वामी समर्थ सेवेकरी तथा आशिष यांचे आई-बाबा सौ. सुमन आणि श्री. वसंत न्हावकर यांच्या शुभहस्ते करमाळा शहरातील कृष्णाजी नगर भागातील श्री देवीचामाळ रोडवरील कॅप्री गोल्ड लोन आणि महालक्ष्मी साडी सेंटर शेजारी येथे उद्घाटन होणार आहे.

करमाळ्यातील खवय्यांसाठी दर्जेदार व स्वच्छ खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा मानस पूर्ण करण्याच्या दृष्टीने करमाळ्यात “दत्त भेळ” ची शाखा काढल्याचे आशिष वसंत न्हावकर यांनी सांगितले असून “दत्त भेळ”च्या नवीन दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यास शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त न्हावकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

.

.

.

