March 1, 2026
IMG-20251120-WA0050

समोरील गटाकडूनही आठ जणांविरुद्ध फिर्याद दाखल

करमाळा, प्रतिनिधी – शेताच्या मोजणी करीता गेलेल्या मोजणी अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. तालुक्यातील विहाळ येथे हा प्रकार घडला आहे.

याबाबत करमाळा भूमी अभिलेख कार्यालयातील हमीद मुजावर इम्रान अब्दुल (वय-४१ वर्षे) यांनी दि. १९/०२/२०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि.१७/०२/२६ रोजी सायंकाळी ०५:४० वाजण्याच्या सुमारास ते करमाळा तालुक्यातील विहाळ येथील अर्जदार हौसराव सुखेदव बनगर/बंडगर यांच्या विहाळ येथील १४०/३ व १४०/4/४ तसेच गुणाबाई सुखदेव बनगर/बंडगर यांच्या गट नं. १४०/१ या क्षेत्राची मोजणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये गेलेले होते. यावेळी मुजावर हे त्यांचे शासकिय काम करीत असताना बाळासाहेब काशीनाथ बनगर/बंडगर, जिवन विश्वंभर बनगर/बंडगर, दिलीप काशीनाथ बनगर/बंडगर, विलास काशीनाथ बनगर/बंडगर (सर्व रा. विहाळ, ता. करमाळा) यांनी मुजावर यांना “पंचनामा व मोजणी बंद कर” असे म्हणुन धमकावण्यास सुरवात केली. त्यावेळी मुजावर यांनी त्यांना “माझ्या शासकिय कामात अडथळा करु नका” असे सांगितले. त्यावेळी पोलीसांनी त्यांना तेथुन हाकलुन दिले व त्यांच्यात आपसात चाललेली भांडण सोडविण्या करीता गेले. यावेळी अचानक वरील नमुद सर्वांनी मुजावर यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. यांपैकी जिवन विश्वंभर बनगर/बंडगर याने मुजावर यांच्या उजव्या हातावर मोजणीच्या पाईपने मारुन जखमी केले.

तसेच बाळासाहेब काशीनाथ बनगर/बंडगर, जिवन विश्वंभर बनगर/बंडगर, दिलीप काशीनाथ बनगर/बंडगर, विलास काशीनाथ बनगर/बंडगर, पांडुरंग बापु बनगर/बंडगर, विठ्ठल विश्वनाथ बनगर/बंडगर, प्रतिक बाळासाहेब बनगर/बंडगर व मंगेश दिलीप बनगर/बंडगर यांनी हौसराव सुखदेव बनगर/बंडगर, रामचंद्र जगन्नाथ बनकर /बंडगर, सुखदेव जगन्नाथ बनगर/बंडगर, वैजीनाथ कृष्णा बनगर/बंडगर, प्रणव वैजीनाथ बनगर/बंडगर व आण्णासाहेब कृष्णा बनगर/बंडगर यांनाही दगड मारुन जखमी केले.

मुजावर यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी बाळासाहेब काशीनाथ बनगर/बंडगर, जिवन विश्वंभर बनगर/बंडगर, दिलीप काशीनाथ बनगर/बंडगर, विलास काशीनाथ बनगर/बंडगर, पांडुरंग बापु बनगर/बंडगर, विठ्ठल विश्वनाथ बनगर/बंडगर, प्रतिक बाळासाहेब बनगर/बंडगर व मंगेश दिलीप बनगर/बंडगर यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला असून सहा.पो.नि. गिरीजा मस्के या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

याच घटनेत विलास काशिनाथ बनगर (वय-६०, रा. विहाळ ता. करमाळा) यांनीही १९/०२/२६ रोजी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१७/०२/२६ रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास त्यांच्या विहाळ येथील एकत्रात असलेल्या शेताची मोजणी करण्यासाठी करमाळा भूमी अभिलेख कार्यालयातील भू करमापक इम्रान मुजावर हे मोजणी करीता आले होते. यावेळी त्यांनी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास उशिराने मोजणी सुरु केल्याने विलास बनगर यांनी मुजावर यांना सायंकाळचे सहा वाजुन गेलेले आहेत, तुम्ही मोजणी करु नका, असे सांगितले. याचा राग मनात धरुन हौसराव सुखदेव बनगर, वेदांत भिसे यांनी अचानक विलास व त्यांच्यासोबत असणाऱ्यांना दगड फेकुन मारुन जखमी केले. तसेच हौसराव बनगर याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने विठ्ठल बंडगर व बाळासाहेब बनगर यांना मारुन जखमी केले. प्रणव बनगर, सोहम बनगर व अभिराज बनगर यांनी त्यांच्या हातातील काठीने आम्हाला मारहाण केली. त्यामध्ये फिर्यादी विलास बनगर, जिवन विश्वनाथ बनगर, दिलीप काशीनाथ बनगर हे जखमी झाले. सदर भांडण चालु असल्याने भूमी अभिलेख कार्यालय, करमाळा यांचेकडील इम्रान मुजावर, भूकरमापक भूकरमापक हे तेथुन पळत जात असताना पाय अडकुन पडल्याने त्यांच्या हाताला जखम झाल्याचे विलास बनकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

विलास काशिनाथ बनगर यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी हौसराव सुखदेव बनगर, सुखदेव जगन्नाथ बनगर, रामचंद्र जगन्नाथ बनगर, वैजीनाथ किसन बनगर, प‌द्माकर किसन बनगर, प्रणव वैजीनाथ बनगर, अभिराव हौसराव बनगर, सोहम प‌द्माकर बनगर वेदांत भिसे (सर्व रा. विहाळ, ता. करमाळा) यांचेविरुध्द भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक पी. बी. टिळेकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *