करमाळा, प्रतिनिधी – अहान इरफान शेख या सहा वर्षाच्या मुलाने इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्यातील पहिला रोजा पुर्ण केला. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) दिवसभर अन्न-पाणी वर्ज्य करून चौदा तास कडक उपवास करतात. अहान शेख हा कुरकुंभ (ता.दौंड) येथील माल वाहतूक व्यवसायिक अजिज शेख यांचा नातू व इरफान शेख यांचा मुलगा आहे. अहान याने अल्पवयात कडक उपवास (रोजा) यशस्वीपणे पूर्ण केला. याबद्दल त्याचे आजोबा करमाळ्याचे पत्रकार नासीर कबीर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

.

.

.

.

.

.

.

