करमाळा, प्रतिनिधी – गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना करमाळा तालुक्यात समोर आली आहे. तालुक्यातील एका माध्यमिक शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी जेऊर येथील एका शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पिडीतेच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिकत असलेल्या तालुक्याच्या पश्चिमेकडील ग्रामीण भागातील एका माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक मारुती ज्ञानदेव किरवे (रा. जेऊर ता. करमाळा जि. सोलापुर) याने मागील चार महिन्यांपूर्वीपासून (नक्की तारीख वेळ माहीत नाही) ते दि.२४/०२/२६ पर्यंत वेळोवेळी त्यांची मुलगी कु. निर्भया हीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला आहे.

सदर फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी मारुती ज्ञानदेव किरवे (रा. जेऊर ता. करमाळा जि. सोलापुर) याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३, अल्पवयीन बालकांचे लैंगिक अत्याचार व शोषणापासून संरक्षण २०१२ व बाल न्याय अधिनियम २०१५ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून स. पो. नि. गिरीजा मस्के या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

