करमाळा, प्रतिनीधी – पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील एका चिमुकल्याने श्रद्धा आणि जिद्दीने कडक उन्हाळ्यातील रोजा पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नालबंद नगर मधील अवघ्या पाच वर्षीय अर्षद नौशाद शेख याने एक दिवसाचा रोजा नुकताच पूर्ण केला आहे.

अल्पवयातही धार्मिक आस्था आणि संयम जपत अर्षद याने दिवसभर उपवास पूर्ण करून शहरातील नालबंद नगर मधील आयेशा मशीद मध्ये रोजा इफ्तार केला आहे. त्याच्या या जिद्दीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आप्तेष्टांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. लहान वयात इतका संयम राखणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब मानली जात आहे. कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली आजोबा हाजी शौकत शेख यांच्याकडे त्याने हट्टाने रोजा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने संयमाने आई वडिलांच्या छायेत इच्छा पूर्णही केली. त्याच्या या कृतीमुळे कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनाही अभिमान वाटत आहे.

रमजान महिना हा संयम, त्याग आणि प्रार्थनेचा संदेश देणारा मानला जातो. अशा पवित्र महिन्यात चिमुकल्या अर्शदने दाखवलेली श्रद्धा आणि चिकाटी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

.

.

.

