March 9, 2026
IMG-20260307-WA0058

करमाळा, प्रतिनिधी – नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शासनाच्या महसूल विभागाकडून तालुकास्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत शनीवार दि.७ रोजी तालुक्यातील केतुर नं.२ येथे विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात आल्या.

केतूर नं.२ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हे समाधान शिबिर पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने या शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, पंचायत समिती सदस्य ॲड. अजित विघ्ने यांच्यासह केतुर नं.२ येथील सरपंच उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामध्ये महसूल, कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख, राज्य परिवहन, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुद्रांक नोंदणी अशा विविध विभागाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहत त्या त्या विभागाकडील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून सोयीच्या ठिकाणी आणि एकाच छताखाली सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ केतूर मंडळातील ग्रामस्थांना झाला. शासनाच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *