पुणे – रिअल इस्टेट क्षेत्रातील ‘राइट टाइम रिअल्टर्स’च्या ‘रॉयल कासा’ या नवीन गृहप्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा रविवार दि.१ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून आधुनिक आणि दर्जेदार निवासाची नवी संकल्पना साकारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जात असल्याचे टीम राइट टाइम रिअल्टर्सच्या वतीने सांगण्यात आले आहे.

आधुनिक जीवनशैली आणि उत्कृष्ट निवासाचा नवा मापदंड निर्माण करण्याच्या उद्देशाने राइट टाइम रिअल्टर्सच्या ‘रॉयल कासा’ या महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. मोहम्मदवाडी परिसरातील कॉरिंथियन्स क्लबच्या शेजारी या भव्य गृहप्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा रविवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडणार आहे.

या शुभारंभप्रसंगी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन टीम राइट टाइम रिअल्टर्सच्या वतीने करण्यात आले आहे.

.

.

.

.

