September 5, 2026
IMG-20260809-WA0039

कुर्डूवाडी, दि. ७ ऑगस्ट : माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्डूवाडी येथे करमाळा व कुर्डूवाडी नगरपरिषदेतील उत्कृष्ट व कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. श्रीराम कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री. ब्रिजपाल संभू वाल्मिकी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ, फेटा व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

करमाळा नगरपरिषदेतील कर्मचारी प्रदीप चौकटे, संतोष मंडलिक, योगेश कांबळे, सतीश खरात, विकास खरात, स्नेहल कांबळे, कौशल्या लोंढे यांच्यासह उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना ब्रिजपाल संभू वाल्मिकी म्हणाले, “आपले काम प्रामाणिकपणे व वेळेत पूर्ण करणारे, कर्तव्याशी निष्ठा ठेवणारे, नागरिकांशी आदराने वागणारे आणि त्यांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारे कर्मचारी यांचा सत्कार करताना मला मनापासून आनंद होत आहे. या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो.”

करमाळा नगरपरिषदेच्या ‘जनसेवा हीच ईशसेवा’ या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कामातून शहराची ओळख निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले. संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा सत्कार व भेटवस्तू देण्याचे हे सलग चौथे वर्ष असून, यापुढेही हे कार्य सुरू ठेवणार असल्याचे वाल्मिकी यांनी सांगितले.

याप्रसंगी कुर्डूवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई भिसे, उपनगराध्यक्षा सविताताई जगताप, नगरसेवक-नगरसेविका, विविध पदाधिकारी, पत्रकार, करमाळा व कुर्डूवाडी नगरपरिषदेतील कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!