June 19, 2026
IMG-20260512-WA0014

करमाळा, प्रतिनिधी – पाण्याचा अती वापर आणि रासायनिक खतांच्या बेसुमार माऱ्यामुळे जमिनी क्षारपड झाल्या असून शेतीची नापीकी वाढली आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पाझर पाईप निचरा प्रणलीचा वापर करुन शेतीमध्ये उत्पादन वाढवावे, असे आवाहन कृषी सहाय्यक देवा फलफले यांनी केले. तालुक्यातील टाकळी येथे बॅक ऑफ महाराष्ट्र आणि ग्रामीण विकास केंद्र (भिगवण) यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणुन फलफले हे बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना फलफले यांनी सांगितले की, मुबलक पाणी आणि रासायनिक खतांच्या बेसुमार माऱ्यामुळे टाकळी परिसरातील शेती मोठ्या प्रमाणात नापीक झाली आहे. हे थांबवण्यासाठी पाझर पाईप निचरा प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. यानंतर माती परीक्षणचे पोपट लकडे यांनी माती परीक्षणाचे महत्व उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिले. यासोबतच महाराष्ट्र बॅकेचे उमेश निकम यांनी बॅक ऑफ महाराष्ट्र व ग्रामीण विकास केंद्र यांच्या विविध योजनांची महिती देत या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

अकुंश कोकाटे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सोमनाथ कुचेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला चेअरमन लतिश लकडे पाटील, सोमनाथ गुळवे, सोमनाथ तावरे, बापु जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!