June 21, 2026
IMG-20260112-WA0011

करमाळा तालुक्यातील घटना

करमाळा, प्रतिनिधी – शासकीय रोपवाटिकेत गवत काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील एका विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्याच्या दक्षिणेकडील उजनी लाभक्षेत्रातील एका गावामध्ये ही घटना घडली आहे.

याबाबत वीस वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.०४/०५/२०२६ रोजी ती तिच्या नात्यातील महिलेसोबत गावातील शासकीय रोपवाटिकेमध्ये गवत काढण्यासाठी गेली होती. यावेळी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी बाळासाहेब मच्छिंद्र बळी (रा. करमाळा) याने ‘तुम्ही येथे का आलात’ असे म्हणून फिर्यादी महिलेचा हात पकडून तिला जवळ घेतले व तिच्याशी असभ्य वर्तन केले.

पीडीतेच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी आरोपी बाळासाहेब मच्छिंद्र बळी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून हेड कॉन्स्टेबल पठाडे हे करत आहेत.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!