प्रथम क्रमांक पटकावलेली शर्वरी सपकाळ तालुक्यातून तृतीय
करमाळा, प्रतिनिधी – शहरातील श्री कमलादेवी प्रसारक मंडळ संचलित गुरुकुल माध्यमिक विद्यालयाने सन २०२५-२०२६ च्या दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील शर्वरी सपकाळ हिने ९७.४०% गुण मिळवत विद्यालयातून पहिला तर तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकावला आहे.

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांनी ९० ते १०० टक्के गुण मिळवले आहेत तर २१ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्के गुण प्राप्त केले आहेत. शर्वरी पाठोपाठ सार्थक सूर्यवंशी याने ९६.२०% गुण मिळवून द्वितीय, वैष्णवी वळेकर हीने ९५.८०% गुण मिळवत तृतीय, भैरवराजे शिंदे व संस्कृती गोयकर या दोघांनी ९५.२०% गुण मिळवून चतुर्थ, नूतन हळनोर हीने ९३.४०% गुणांसह पाचवा, यश जगताप, साक्षी नलवडे व आदित्य गायकवाड या तिघांनी ९२% गुण मिळवत सहावा तर प्रतीक्षा सूर्यवंशी हीने ९१.२०% गुण प्राप्त करत विद्यालयातून सातवा क्रमांक मिळवला आहे.

विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांत विशेष प्राविण्य मिळवले असून गणित विषयात १०० पैकी १००, सायन्समध्ये ९८, मराठी व हिंदीमध्ये ९६, इंग्लिशमध्ये ९५ तसेच समाजशास्त्र विषयात ९६ गुण मिळवत यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयातील उणीवा ओळखून वेळोवेळी मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक नितीन भोगे यांनी प्रत्येक १५ दिवसांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेत योग्य मार्गदर्शन केले. वर्षभर घेतलेल्या टेस्ट, पाठांतर, प्रिलियम परीक्षा, पालक-विद्यार्थी-शिक्षक सुसंवाद आणि वेळेत पूर्ण केलेला अभ्यासक्रम यामुळे हे यश शक्य झाल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या यशासाठी शाळेच्या शिक्षिका गौरी भगत, स्वाती सपकाळ, सुनिता बनसोडे, सारीका शिंदे आणि शिक्षक ज्ञानेश्वर वाघमारे, अमोल सातव, ऋषिकेश घोगरे, महेश जगताप आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक नितीन भोगे, सचिव रेश्मा भोगे तसेच विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

.

.

.

