करमाळा, टेंभुर्णी प्रतिनिधी – माढा तालुक्यातील फुटजवळगाव येथे बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. या ग्राहक सेवा केंद्रामुळे फुटजवळगाव व परिसरातील ग्रामस्थांना ग्रामीण भागातील बँकेच्या सेवा व योजनांचा लाभ मिळणार आहे.

सोमवार दि.९ रोजी बँक ऑफ इंडियाच्या टेंभुर्णी शाखेचे व्यवस्थापक शामराव तेळे यांच्या हस्ते आणि तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख, तालुका व्यवस्थापक शरद सातपुते आणि कुर्डू प्रभाग समन्वयक नीता काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेवा केंद्राचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी टेंभुर्णी शाखा व्यवस्थापक तेळे यांनी ग्राहक सेवा केंद्राच्या संचालिका सुषमा नवले यांना शुभेच्छा देत बॅंक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय ग्रामीण भागातील ग्राहक सेवा केंद्रामुळे बँक ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी किंवा बँकेच्या विविध योजनांच्या माहितीसाठी टेंभुर्णी किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नसल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला फुटजवळगावच्या सरपंच शोभा पवार, ग्रामसेवक समीर शेख, पोलीस पाटील संजय खोचरे, वामनराव नवले, योगेश नवले यांच्यासह फुटजवळगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधत महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन विजेत्या महिलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

.

.

.

.

