करमाळा, प्रतिनिधी – श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत विद्यार्थ्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.

यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील व डॉ. कविता कांबळे यांच्या हस्ते या नव्या वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, शाळेच्या सर्वेसर्वा सौ. सुनीता देवी व मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. ट्विंकलिंग स्टार्समध्ये विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होऊ नये तसेच अधिक प्रशस्त व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नवीन वर्गखोल्या उभारण्यात आल्या असल्याचे सौ. सुनीता देवी यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करत, आधुनिक तंत्रज्ञानामुळे माहिती सहज उपलब्ध होत असली तरी योग्य-अयोग्याचा विवेक निर्माण करण्यासाठी गुरुंचे स्थान आजही सर्वोच्च असल्याचे सांगितले. गुरु-शिष्य संवाद अधिक प्रभावी व्हावा आणि विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या हेतूने नव्या वर्गखोल्यांची निर्मिती करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

.

.

.

.

.

