August 5, 2026
IMG-20260802-WA0010

करमाळा, प्रतिनिधी – नाशवंत गोष्टींचा मोह टाळून शाश्वत मूल्ये लक्षात घेऊन युवकांनी समाजकारण व राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करावी. आजच्या काळात जो सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जातो, त्यांच्या अडी-अडचणी सोडवतो, त्यालाच जनता नेता म्हणून स्वीकारते. वारशापेक्षा संघर्ष, कष्ट आणि स्वकर्तृत्वातून स्वतःला सिद्ध करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद/शेत रस्ता समितीच्या करमाळा विधानसभा सहअध्यक्षपदी दिग्विजय बागल यांची निवड तसेच भाजपच्या सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे यांची निवड झाल्याबद्दल जगताप परिवाराच्या वतीने आयोजित घरगुती सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी जगताप म्हणाले, “जो दौडेगा, वो मंजिल पाएगा.” युवकांनी बुजुर्ग मंडळींचे मार्गदर्शन घेत कष्टाच्या बळावर ध्येय गाठावे आणि मिळालेल्या संधीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी करावा. राष्ट्र व समाजहितासाठी युवकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ज्येष्ठांनीही कर्तृत्ववान युवकांच्या पाठीशी राहून वडीलकीच्या नात्याने त्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दिग्विजय बागल यांची मुख्यमंत्री बळीराजा पाणंद/शेत रस्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालील समितीच्या करमाळा विधानसभा सहअध्यक्षपदी निवड झाली आहे. तर भाजपचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेले विद्यमान जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे यांची सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही मान्यवरांचा जगताप परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी जयवंतराव जगताप यांनी देशभक्त कै. नामदेवराव जगताप, स्व. आण्णासाहेब जगताप यांच्या कार्याचा तसेच माजी राज्यमंत्री स्व. दिगंबर बागल मामा यांच्यासोबतच्या स्नेहपूर्ण संबंधांचा उल्लेख करत १९८९ पासूनच्या राजकीय व सामाजिक वाटचालीतील विविध आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमोदशेठ संचेती, ज्येष्ठ समाजसेवक श्रेणीकशेठ खाटेर, माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, प्रशांत ढाळे, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, बबन मेहेर, बाजार समिती संचालक जनार्दन नलवडे, सचिव विठ्ठल क्षीरसागर, उद्योजक संतोषशेठ गुगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रा. दत्तात्रय भागडे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. दीपक ओहोळ, श्रेणीकशेठ खाटेर, संजय घोरपडे व बबन मेहेर यांनी मनोगते व्यक्त केली. सत्कारमूर्ती दिग्विजय बागल व गणेश चिवटे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य डॉ. तानाजी जाधव यांनी मानले.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!