करमाळा तालुक्यातील वाशिंबे ग्रामपंचायतीने ‘आदिशक्ती अभियानात’ उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकासह तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे वाशिंबे ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकासाठी ३ लाख रुपये, तर तालुकास्तरीय प्रथम क्रमांकासाठी १ लाख रुपये, अशी एकूण ४ लाख रुपयांची पुरस्कार रक्कम प्राप्त झाली आहे.

या यशामध्ये अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, बचतगट अध्यक्षा, सीआरपी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, पोलिस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक ऑपरेटर, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सामूहिक प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम आणि सीडीपीओ किरण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनासोबतच ग्रामपंचायतीतील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या गौरवशाली कामगिरीबद्दल वाशिंबे ग्रामपंचायतीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यातही विविध विकासकामांत उत्कृष्ट कामगिरी करत गावाचा नावलौकिक वाढविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

.

.

.

.

.

