पुणे – च-होली येथे तथागत वेल्फेअर फाउंडेशन व सप्तगड भीम महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

“इंडिया अर्थात भारत हीच आपल्या देशाची खरी ओळख आहे,” असे ठामपणे सांगताना त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम १चा संदर्भ दिला. “इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स,” या वाक्यातून देशाची दुहेरी पण अभिमानास्पद ओळख स्पष्ट होते. ‘इंडिया’ ही जागतिक स्तरावरील ओळख असली, तरी ‘भारत’ हा आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा आत्मा आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने “इंडिया अर्थात भारत” ही ओळख अभिमानाने मांडली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या भाषणात त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांवर प्रकाश टाकत सांगितले की, “हा देश केवळ हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांचा नाही, तर सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा आहे.” भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करते आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देते. यामुळे समाजात एकोपा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ होते.
या कार्यक्रमास तथागत वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष रंगनाथ वाघमारे, खजिनदार सदानंद उदागे, सचिव राजू इंगळे, सल्लागार प्रविण सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र ढगे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष धनराज मनोहर, खजिनदार समाधान ओव्हाळ, सचिव सचीन कांबळे तसेच अशोक गायकवाड, राजेश आखाडे, सोमनाथ कांबळे, प्रभाकर सूर्यवंशी, जीवन कांबळे, अरविंद केदारी, चिलवंत सर, गोंडगे साहेब, मोरे साहेब, कुसळे साहेब, निकम साहेब, सनी गवई, वानखेडे सर, वनकर सर, रोकडे साहेब, गायकवाड सर यांनी परिश्रम घेतले.

विचारमंचावर आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे राज्य प्रतिनिधी व पुणे जिल्हा समन्वयक, सुप्रसिद्ध व्याख्याते अँड. नितीन घोडके, प्रशांत देठे यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकर्ते, महिला वर्ग व तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेबाबत व्यापक जनजागृती झाली असून “इंडिया अर्थात भारत” ही ओळख अभिमानाने जपण्याचा प्रभावी संदेश उपस्थितांना देण्यात आला.

.

.

