May 6, 2026
IMG-20260418-WA0054(1)

उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांचे स्पष्टीकरण

सोलापूर – सोलापूर वनविभागातील निलंबित लेखापालाने शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला खोटी व अर्धवट माहिती देवून तक्रारी करण्यास उद्युक्त केल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून उघड झाले आहे. स्वतःचे निलंबन रद्द करुन इच्छित ठिकाणी पदस्थापना मिळवण्यासाठी त्याने हा खटाटोप केला असल्याचे स्पष्टीकरण सोलापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी दिले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी सांगितले आहे की, शासकीय कामकाजात अनियमितता, गैरवर्तन व महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ चा भंग केल्यामुळे सोलापूर वन विभागातील लेखापाल सिद्धेश्वर कैलास सगरे यांना निलंबीत करण्यात आले आहे. यानंतर वनविभागामध्ये महाराष्ट्र राज्य जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश अभिमान भानवसे यांचे तक्रारी अर्ज वनविभागास प्राप्त झाले असून त्यांच्या तक्रारींची वनविभागातील त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरू आहे.

चौकशी दरम्यान निलंबीत लेखापाल सिद्धेश्वर कैलास सगरे यांनीच तक्रारदार गणेश अभिमान भानवसे यांना खोटी व अर्धवट माहिती देवून स्वतःचे निलंबन रद्द करण्यासाठी व पाहिजे तेथे पदस्थापना मिळवण्यासाठी तक्रारी करण्यास उद्युक्त केल्याचे सगरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर कबूल केले असल्याचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून संगणमत उघड

निलंबीत लेखापाल सिद्धेश्वर कैलास सगरे आणि तक्रारदार गणेश भानवसे हे सोलापूर शहरातील एका नामांकित हॉटेल परिसरात एकत्र दिसल्याचे सीसीटीव्ही फुटेज वनविभागाला प्राप्त झाले आहे. यावरून हे तिघे संगनमताने वनविभागाविरोधात खोट्या तक्रारी करत असल्याचा भांडाफोड झाला आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!