महाकाली जिवंत देखाव्यासह रोमहर्षक दहीहंडी सोहळ्याचे महिलांच्या हस्ते होणार उद्घाटन
करमाळा, प्रतिनिधी – गोपाळकाल्यानिमित्त केवळ दहीहंडी बांधणे आणि थर लावून ती फोडणे या पारंपारिक प्रथेला वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची जोड देत करमाळा शहरातील दत्तपेठ तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात. यावर्षीही गोपाळकाल्या निमित्त दहीहंडी सह विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती दत्तपेठ तरुण मंडळ आणि श्रेणिक शेठ खाटेर युवा मंचच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक शेठ खाटेर आणि नगरसेवक अमोल परदेशी यांनी दिली आहे.
शनिवार दि.०५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, नगराध्यक्षा मोहिनी सावंत, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी चिवटे आणि माजी नगरसेविका संगीता खाटेर यांच्या हस्ते आणि करमाळा शहर विकास आघाडीचे मार्गदर्शक विठ्ठल आप्पा सावंत, करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने, शिवगिरी शुगरचे चेअरमन किरणतात्या सावंत, टायगर ग्रुपचे डॉ. तानाजी जाधव, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, उपनगराध्यक्ष अतुल फंड, माजी उपनगराध्यक्ष ॲड. कमलाकर वीर, पै. सुधाकर (काका) लावंड यांच्यासह करमाळा शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक आणि व्यापारी वर्गाच्या प्रमुख उपस्थितीत दत्तपेठ तरुण मंडळाच्या दहीहंडी सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. दत्तपेठ तरुण मंडळाच्या या वर्षीच्या दहीहंडी उत्सवात महाकाली या जिवंत देखाव्यासह अघोरी महाकाल हा देखावा सादर करण्यात येणार आहे. या देखाव्याचा पहिला प्रयोग हा महिला वर्गासाठी ठेवण्यात आलेला आहे. याशिवाय माही डेकोरेटर्स कडून दहीहंडीची आकर्षक सजावट, श्रीकृष्णाची वेशभूषा, दर्जेदार साऊंड सिस्टिमसह उत्कृष्ट ऑपरेटर, ड्रोन द्वारे फोटोग्राफी, सॅक्सोफोनवरील सुमधुर गाणी आणि नेत्र दीपक विद्युत रोषणाई हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
दत्तपेठ तरुण मंडळाच्या या रोमहर्षक दहीहंडी सोहळ्यात शहर व तालुक्यातील सर्व गोविंदा पथकासह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन दत्त पेठ तरुण मंडळ तसेच श्रेणिक शेठ खाटेर युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
.
.
.
.