July 28, 2026
IMG-20260630-WA0035

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत जिल्हा परिषद प्रशासनाने तालुक्यातील १३ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पाचवीचे वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता.

यावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी इयत्ता पाचवीच्या वर्गांना मंजुरी मिळावी, अशी मागणी सातत्याने आमच्याकडे केली होती. आम्ही सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांच्या सहकार्यामुळे हा शैक्षणिक प्रश्न मार्गी लागला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चौथीनंतर शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जावे लागू नये, शिक्षणाचा प्रवास खंडित होऊ नये आणि पालकांवरील आर्थिक भार कमी व्हावा, या उद्देशाने हा, भविष्यातही ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अशाच प्रकारे सकारात्मक निर्णय घेतले जातील असेही गणेश चिवटे यांनी सांगितले,

या १३ शाळांना मिळाली मंजुरी

यामध्ये करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा (वाघाची वाडी), मानेवस्ती (कंदर), सुपनवर वस्ती (धायखिंडी), म्हसेवाडी (अर्जुननगर), गुटाळ वस्ती (केम), पायघन वस्ती (शेलगाव क.), चौधरवाडी (झरे), गारगुट वस्ती (उमरड), चव्हाण वस्ती (मांजरगाव), हुलगेवाडी (कोर्टी), नाळे वस्ती (विहाळ), धगटवाडी (रावगाव) आणि इंगळे वस्ती (कंदर) या १३ शाळांचा समावेश आहे.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!