July 28, 2026
IMG-20260628-WA0032

माहिती मागणाऱ्यावर विनयभंग दाखल

करमाळा प्रतिनिधी – ग्रामपंचायतीत माहितीच्या अधिकाराचा अर्ज दिल्यावरूनच्या वादातून मारहाण आणि विनयभंगाचे परस्परविरोधी गुन्हे करमाळा पोलिसात दाखल झाले आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात हा प्रकार घडला आहे.

याबाबत माहिती अधिकाराचा अर्ज करणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२३/०६/२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास ते गावातील ग्रामपंचायतीत घराचा उतारा काढण्यासाठी गेले असताना गावातील महिला सरपंचाने ‘ग्रामपंचायत मध्ये माहिती अधिकाराचा अर्ज का दिला’ म्हणुन लोखंडी पाईपने डोक्यात मारून जखमी केले. यावेळी महिला सरपंचाच्या इतर ३ नातेवाईकांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलीस हवालदार पांडुरंग आरकीले या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

याच घटनेत महिला सरपंचाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२३/०६/२६ रोजी ग्रामपंचायतीची मासिक बैठक असल्याने त्या गावातील जिल्हा परिषद शाळेत गेल्या होत्या. यानंतर साडेदहाच्या सुमारास गावातील एकजण तेथे आला व ‘मी माहितीचा अधिकार दिल्यावरच गावातील विहिरीवर जाळी कशी बसवायला लागला’ असे म्हणाला. यावेळी महिला सरपंचाने ‘जाळीचे इस्टिमेट बनवले आहे म्हणुन जाळी बसवायचे काम चालु आहे’ असे त्याला समजावुन सांगत असताना आरोपी फिर्यादीजवळ आला व लैंगिक हेतुने फिर्यादीकडे पाहुन व हात पकडुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले आहे. पो.हे.कॉ. सुहास पवार हे या गुन्हयाचा अधिक तपास करत आहेत.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!