July 28, 2026
IMG-20260628-WA0029

करमाळा, प्रतिनिधी – आमदार म्हणुन जबाबदारी पार पाडत असताना कंदर-केम-रोपळे-कन्हेरगाव या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे, विरोधक काय टिका करतात, याची दखल सुद्धा घेत नसल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. कंदर-केम-रोपळे-कन्हेरगाव रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

कंदर-केम-रोपळे-कन्हेरगाव हा सुमारे २५ किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यासाठी एबीडी योजनेतून २०० कोटी रुपयांचा निधी आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्यानंतर केम आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी आभार व्यक्त करण्यासाठी जेऊर येथे आमदार नारायण आबा पाटील यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य अजितदादा तळेकर, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बिचितकर, युवानेते पृथ्वीराज पाटील, नागनाथ तळेकर, कांतिलाल पळसे, प्रकाश तळेकर, सतीश खानट, सुदाम तरंगे, राहूल कोरे, श्रीहरी तळेकर, कुंडलिक देवकर, हंबीरराव गोरे, शौकत मुलाणी, सचीन बिचितकर, नागनाथ दौंड, दत्ता तळेकर, किरण खरवडे, मनोज भोसले, समीर तळेकर, प्रशांत बिचीतकर, अशोक कुंभार, अमोल गायकवाड, तात्यासाहेब गोडगे, रवीकिरण फुके, राजाभाऊ झोळ, राजेंद्र भोसले आदीजण उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेकडे आपण या रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा म्हणुन प्रयत्न केला व सतत पाठपुरावा केला. यास यश आल्याने आता केमसह अनेक गावांना दळणवळणाची चांगली सोय होणार आहे. भविष्यात केम साठी अनेक विकासकामे मंजुरीच्या प्रतिक्षेत असल्याने या भागाचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. दहिगाव उपसाचे पाणी वडशिवणे तलावात पोहचवण्यचे काम मी तुम्ही दिलेल्या आमदार पदामुळेच करु शकलो.

विरोधकांना आता हाती करावयास कसलेही काम उरले नसल्याने ते सतत माझ्यावर टिका करत आहेत. वास्तविक पाहता माझ्या आख्या कारकिर्दीत माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसल्याचे पाहून वैफल्यग्रस्त होऊन विरोधक काहीही आरोप करत सुटले आहेत. मी टिकेला घाबरत नाही. भविष्यात रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असुन तालूक्याचा समान विकास साधला जाईल. विकासाच्या मुद्यावर संपूर्ण गावांनी गटतट बाजूला सारुन एकत्र यावे असे आवाहन आमदार नारायण आबा पाटील यांनी केले.

प्रास्ताविक पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य अजितदादा तळेकर यांनी आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली. आभार नागनाथ तळेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला केम व‌ परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!