जेऊरच्या रोड रोमियोवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
करमाळा, प्रतिनिधी – सहा महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या युवकाने सदर मुलीला वस्तू देण्याचा प्रयत्न केला. वस्तू घेण्यास मुलीने नकार दिल्यानंतर या युवकाने तिला रस्त्यात अडवून जबरदस्तीने ही वस्तू देण्याचा प्रयत्न केल्याने सदर अल्पवयीन मुलीने त्याच्याविरुद्ध करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२३/०६/२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कॉलेज संपवून घरी जात असताना एका घराजवळ शिवकुमार मोहन पिसे याने काहीतरी वस्तू असलेली डबी जबरदस्तीने देण्याचा प्रयत्न केला व फिर्यादीचा डावा हात पकडुन फिर्यादीचा विनयभंग केला. आरोपी हा गेल्या सहा महिन्यांपासून तिचा पाठलाग करत असल्याचे फिर्यादीने या फिर्यादीत नमूद केले आहे.

या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी शिवकुमार मोहन पिसे याच्याविरुद्ध बालकांचे लैंगीक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीस करमाळा पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेऊन शनिवारी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहा.पो.नि. दिलीप ढेरे हे या गुन्हयाचा अधिक तपास करत आहेत.

.

.

.

.

.

