July 28, 2026
IMG-20260627-WA0030

करमाळा, प्रतिनिधी – मोठ्या शहरातून वस्त्र खरेदीचा आनंद आता करमाळा शहरात मिळणार आहे. दर्जेदार साड्या व कपड्यांसाठी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या विराज टेक्सटाईल मिल या दालनाचे करमाळा शहरात उद्या उद्घाटन होणार आहे.

विराज टेक्सटाईल मिल हे महाराष्ट्रातील दर्जेदार साड्या व कपड्यांसाठी प्रसिद्ध दालन आहे. या नामांकित ब्रॅण्डच्या करमाळा शहरातील दालनाचे उद्या रविवार दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता भव्य उद्घाटन होणार आहे. उरळी कांचन येथील सुप्रसिद्ध विराज टेक्सटाईल मिलने थेट ग्राहकांसाठी हे दालन सुरू केले असून, “डायरेक्ट मिल ते ग्राहक” या संकल्पनेतून ग्राहकांना दर्जेदार साड्या व कपडे वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शहरातील श्री कमलादेवी रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूस मस्कर अँग्रोच्या शेजारी हे नवीन दालन सुरू होत आहे. वस्त्र विश्वाचा १९९८ पासून अनुभव असलेले भाऊसाहेब औदुंबर खुने आणि बाळासाहेब औदुंबर खुने (दाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे मेहुणे दत्ता हजारे आणि सार्थक हजारे यांनी हे दालन करमाळा आणि परिसरातील ग्राहकांसाठी सुरू केले आहे. या उद्घाटन सोहळ्याला करमाळा शहर आणि तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक प्रतिष्ठितांची तसेच शहरातील सर्व व्यापारी आणि नागरिकांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विराज ग्रुप, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!