July 28, 2026
IMG-20260710-WA0002

सहा सोलर प्लेट फोडल्या

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील तरटगाव येथील महिला शेतकऱ्याच्या शेतातील नुकत्याच लावलेल्या सोलर प्लेट अज्ञाताने फोडल्या आहेत. दि. ७ जुन रोजी ही घटना उघडकीस आली आहे.

याबाबत किष्किंधा चक्रधर बावडकर (वय-५१) यांनी करमाळा पोलीसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, दि.०४/०७/२६ ते दि.०७/०७/२६ दरम्यान त्यांची तरटगाव शेती गट नं.४१ मध्ये बसविलेले सोलर पॅनलचे अज्ञात व्यक्तिने फोडुन नुकसान केले आहे.

बावडकर यांच्या तक्रारीवरून करमाळा पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम 324(2) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.

दीड महिन्यांपूर्वीच मी माझ्या शेतात रु.४५,००० खर्च करून दोन ठिकाणी सोलर पॅनलचे युनिट बसवले होते. या युनिटच्या सहा प्लेट्स अज्ञाताने पूर्णपणे फोडून टाकल्या आहेत. सध्या पिकांना पाणी देण्याचे दिवस असताना सोलर पॅनल फोडून टाकल्याने आमचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी त्वरित तपास करुन हा प्रकार करणाराला शोधून काढावे.
-किष्किंधा चक्रधर बावडकर,
महिला शेतकरी, तरटगाव, ता. करमाळा.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!