July 28, 2026
IMG-20260709-WA0004

सर्व स्तरातून ध्रुवचे कौतुक

बारामती – लहान वयात मुले बोलायला आणि शब्द ओळखायला शिकत असतात. मात्र बारामती मधील अवघ्या अडीच वर्षांच्या ध्रुव रोहन पवार या चिमुकल्याने संपूर्ण हनुमान चालीसा स्पष्ट उच्चारात म्हटत एक अनोखा जागतिक विक्रम नोंदवला आहे. एवढ्या लहान वयात त्याने दाखवलेली विलक्षण स्मरणशक्ती, एकाग्रता आणि भक्तीभाव पाहून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

१२ जानेवारी २०२३ रोजी जन्मलेल्या ध्रुवचा हा अद्भुत पराक्रम २६ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतरीत्या नोंदविण्यात आला. त्या वेळी त्याचे वय २ वर्षे ६ महिने १४ दिवस इतके होते. एवढ्या लहान वयात त्याने संपूर्ण हनुमान चालीसा आत्मविश्वासाने आणि स्पष्ट उच्चारात म्हटल्यामुळे उपस्थित सर्वजण थक्क झाले. ध्रुवच्या या विलक्षण कामगिरीची दखल घेत Influencer Book Of World Records या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्याचे नाव अधिकृतरीत्या नोंदवले आहे. “Tiny Voice, Timeless Devotion – Complete Hanuman Chalisa Recited at Just 2.5 Years” या विशेष शीर्षकाखाली हा जागतिक विक्रम मान्य करण्यात आला आहे.

ध्रुव हा रोहन अरविंद पवार आणि ऐश्वर्या रोहन पवार यांचा सुपुत्र आहे. लहानपणापासूनच घरातील धार्मिक वातावरण आणि संस्कारांमुळे त्याला हनुमान चालीसाची ओळख झाली. पालकांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने ऐकून आणि सराव करून ध्रुवला संपूर्ण हनुमान चालीसा पाठ झाली आहे. ध्रुवच्या याअद्वितीय ,उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्रच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, पद्मविभूषण सुधा मूर्तीजी (इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे संस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या पत्‍नी ), स्वाती मालीवाल (राज्यसभा खासदार) आणि अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी ध्रुवचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नगरसेवक अतुल दादा तरवडे यांनी रोख ₹५००१ रुपयांचे बक्षीस देऊन त्याचा सन्मान केला आहे.

अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याने केलेली ही अद्वितीय कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, लहान मुलांमध्ये संस्कार, श्रद्धा आणि स्मरणशक्ती वाढविण्याचा हा सुंदर आदर्श ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!