June 19, 2026
IMG-20260613-WA0007

देवीचामाळ येथील प्रकार

करमाळा, प्रतिनिधी – रस्त्याच्या बाजूला असलेल्या मटणाच्या दुकानातून मटण घेऊन येईपर्यंत मोटरसायकलच्या हँडलला अडकवलेल्या पिशवीतील रक्कम हातोहात लंपास करण्यात आली आहे. करमाळा शहरा नजीकच्या श्रीदेवीचा माळ येथे ही घटना घडली आहे.

याबाबत करमाळा तालुक्यातील फिसरे येथील हनुमंत रामभाऊ रोकडे (वय-36 वर्षे) यांनी दि.11/06/2026 रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 09/06/2026 रोजी सकाळी त्यांनी हॉटेलमधील कामगारांच्या पगारीसाठी बँक ऑफ इंडीयाच्या करमाळा शाखेतून रु.1,80,000 काढून पिवळ्या रंगाच्या पिशवीमधील लहान पिशवीत गुंडाळून ठेवले होते. यानंतर ही पिशवी मोटारसायकलच्या हँन्डलला अडकवून ते देवीचा माळ येथील मटन शाॅप मध्ये मटन घेण्यासाठी गेले. मटन घेऊन निघाल्यावर त्यांनी मोटारसायकलला अडकवलेली पिशवी तपासून पाहीली असता सदर पिशवीमध्ये ठेवलेली रोख रक्कम रु.1,80,000 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांना दिसून आले.

रोकडे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल केला असून करमाळा पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!