करमाळा, प्रतिनिधी – खाजगी वाहन भाड्याने देण्याचा व्यवसाय करणाऱ्या जावयाला पत्नीसह सासरच्यांनी शिवीगाळ करत काठी दगड आणि चपलेने मारहाण केली आहे. शहरातील तुकाराम नगर येथे हा प्रकार घडला आहे.

याबाबत करमाळा तालुक्यातील भालेवाडी येथील ज्ञानेश्वर रामा जाधव (वय-35 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.11/06/2026 रोजी दुपारी 03/00 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या गाडीचे भाडे आणण्यासाठी करमाळा शहरातील तुकाराम नगर येथील एका महिलेच्या घरी गेले होते. यावेळी तेथे त्यांची पत्नी रेश्मा ज्ञानेश्वर जाधव, सासरे बजरंग भानुदास पवार, चुलत सासरे अशोक भानुदास पवार, चुलत सासु शांताबाई अशोक पवार (सर्व रा. उत्तर वडगाव ता. करमाळा) हे आले व फिर्यादी ज्ञानेश्वर यांना शिवागाळ करुन काठी, दगड व चप्पलने मारहाण करुन जखमी केले.

ज्ञानेश्वर जाधव यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला असून पोलीस नाईक अशपाक शेख हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

.

