करमाळा, प्रतिनिधी – दत्तकला शिक्षण संस्थेच्या भिगवण (स्वामी-चिंचोली) येथील दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्समध्ये शुक्रवार दि.१३ आणि रविवार दि. १४ मार्च २०२६ रोजी ‘ट्रेंड्स इन मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग स्ट्रीम्स’ (TIMES-2K26) या पहिल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी संपन्न झाले. या दोन दिवसीय परिषदेसाठी भारतासह फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि तैवान येथील दिग्गज संशोधक आणि तज्ज्ञ उपस्थित आहेत.

भारतातील जीएलए युनिव्हर्सिटीचे प्रकुलगुरु प्रा. डी. एस. चौहान, फिलिपाईन्स मधील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ सदर्नच्या इलेक्ट्रोमेकॅनिकल तंत्रज्ञान विभागाच्या डॉ. कॅथलीन इबोरा पाद्रिगालन आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे डॉ. मायकल ए. कापिलयन, इंडोनेशियातील पडांग येथील नेगेरी विश्वविद्यालयाच्या ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग विभागाचे डॉ. द्वी सुदार्नो पुत्रा आणि तैवान मधील लाब्रे ऑप्टोइलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचे संशोधन आणि विकास अभियंता डॉ. फिरोज इस्माईल मुलाणी यांच्या हस्ते आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिवा प्रा. माया झोळ आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ विशाल बाबर , दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. श्रीकांत साळुंखे, डॉ. एन. पी. देशमुख, डॉ. एस. एस. बेरे, डॉ. पी. एस. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून आणि राष्ट्रगीताने या परिषदेला सुरुवात झाली.

शुक्रवारच्या पहिल्या सत्रात प्रकुलगुरु प्रा. डी. एस. चौहान उपस्थित विद्यार्थ्यांना भारतातील शैक्षणिक संधी विषयी तर डॉ. कॅथलीन इबोरा पाद्रिगालन यांनी इलेक्ट्रोमेकॅनिकल तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन केले. भोजनानंतरच्या दुपारच्या सत्रात डॉ. फिरोज इस्माईल मुलाणी ऑप्टो इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीच्या संशोधन आणि विकासाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि फिलिपाईन्स मधील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ सदर्न फिलिपाईन्स (USTP) यांच्या सहकार्याने आयोजित या परिषदेच्या अनुषंगाने आज शनिवार दि.१४ रोजी डॉ. मायकल ए. कापिलयन हे इलेक्ट्रॉनिक्स तर डॉ. द्वी सुदार्नो पुत्रा हे ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगच्या व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन बदलांवर प्रकाश टाकणार आहेत.

ही परिषद हायब्रीड मोडमध्ये असल्याने जगभरातील अनेक संशोधक ऑनलाईन माध्यमांतूनही या परिषदेत सहभागी झाले आहेत.

.

