May 6, 2026
IMG-20260314-WA0003


करमाळा, प्रतिनिधी – शहरातील श्री गिरदरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये गिरदरदास देवी यांची जयंती अकरा मार्च रोजी साजरी करण्यात आली.

बरेच अडथळे पार करून 1997 या वर्षी नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल रुपी रोपटे लावण्याचे काम गिरधरदास भाई यांनी केले होते, त्याच रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी गिरधरदास देवी विद्यालयाची ही स्थापना केली. भई यांनी शहरांमध्ये सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा केली होती. त्यांनी सलग 25 वर्ष नगराध्यक्ष पदाची कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण करून विविध योजना देखील त्यांनी पूर्ण केल्या होत्या म्हणूनच त्यांना करमाळा भूषण हा पुरस्कार सुद्धा दिला गेला आहे.

राजकारण करीत असताना व्यापारी व नागरिकांची सोय व्हावी त्यांना व्यवसायासाठी मदत व्हावी या हेतूने करमाळा अर्बन बँकेचे ही स्थापना त्यांनी केली. आठ मार्च महिला दिनाचे व गिरधरदास देवी यांच्या जयंतीचे औचित्य साधून करमाळा शहरातील राजकीय शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या 52 महिलांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम शाळेमध्ये भई यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना विनम्र असे अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री कन्हैयालाल देवी ,शाळेच्या सर्वेसर्वा सौ सुनीता देवी मॅडम, मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर मॅडम, अर्बन बँकेचे मॅनेजर प्रकाश क्षीरसागर सर, बँकेचे संचालक जितेश कटारिया, एस पी कांबळे सर, वाहिद सर, राजा सली, विजुभाऊ सुपेकर हे होते .कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेच्या सर्वेसर्वा सौ सुनीता देवी मॅडम यांनी शाळेस डिजिटल बेल सप्रेम भेट दिली. शाळेमध्ये वर्षभरामध्ये झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सुनिता देवी मॅडम यांच्यातर्फे हॉटेल मध्ये मेजवानी देण्यात आली .हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सविता बागल मॅडम यांनी केले.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!