May 6, 2026
IMG-20260318-WA0019

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील जेऊर येथील इंदीरानगर परिसरात अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या LPG गॅस सिलेंडरवर पुरवठा विभागाने धडक कारवाई करत एकूण २० रिकामे सिलेंडर जप्त केले असल्याची माहिती पुरवठा निरीक्षण अधिकारी शत्रुघ्न चव्हाण यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना चव्हाण यांनी सांगितले आहे की, मंगळवार दि.१७ मार्च रोजी मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे जेऊर येथील इंदिरानगर येथे राहणाऱ्या विजय बोराडे यांच्या कडे LPG गॅस सिलेंडरचा अवैध साठा आढळून आला. तपासणी दरम्यान संबंधितांकडे कोणताही वैध परवाना उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तसेच काही सिलेंडर आडव्या स्थितीत ठेवलेले असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर धोका निर्माण झाला होता. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या या अवयव साठ्यावर धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत IOCL, HPCL व BPCL या कंपन्यांचे खालील प्रमाणे एकूण २० रिकामे LPG सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.
14.2 कि.ग्रॅ. घरगुती सिलेंडर- 15 नग,
5 कि.ग्रॅ. घरगुती सिलेंडर – 3 नग,
5 कि.ग्रॅ. व्यावसायिक सिलेंडर – 2 नग

सर्व जप्त सिलेंडरचा पंचनामा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पुरवठा निरीक्षण अधिकारी चव्हाण यांनी सांगितले आहे.

सदर कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (सोलापूर), व जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे (सोलापूर) तसेच करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी शत्रुघ्न मोतीराम चव्हाण व लिपीक-टंकलेखक उदय गोडगे यांच्या पथकाने पार पाडली.

अधिकाऱ्यांचे निवेदन-
गॅस काळाबाजार रोखण्यासाठी तालुका स्तरावर विशेष पथक नेमण्यात आले आहे. कोणीही घरगुती गॅसचा अवैध वापर करत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
शिल्पा ठोकडे,
तहसिलदार, करमाळा.

अवैध गॅस साठा व घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहतील. नागरिकांनी घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-शत्रुघ्न मोतीराम चव्हाण,
पुरवठा निरीक्षण अधिकारी,
तहसील कार्यालय, करमाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!