करमाळा, प्रतिनिधी – पवित्र रमजान महिना सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष प्रतिनिधी आणि नगरसेवक संजय सावंत यांच्या उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे इफ्तार पार्टी संपन्न झाली.

शहरातील वेताळ पेठ येथील जामा मस्जिद येथे रविवार दि. १५ रोजी सायं. ६:३० वाजता या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इफ्तार नमाज पठण आणि तकरीर साठी जमा झालेल्या शहरातील मोहल्ला भागासह इतर ठिकाणच्या मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला.

यावेळी नगरसेवक प्रतिनिधी दादासाहेब इंदलकर, अमोल परदेशी, दीपक सुपेकर, अभय महाजन यांच्यासह मुस्लिम समाजाचे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या इफ्तार पार्टी बद्दल जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष जमीर सय्यद, सदस्य मजहर नालबंद, वाजिद शेख यांनी आयोजकांचे आभार मानून उपस्थितांचा सत्कार केला.

.

.

.

.

