May 6, 2026
IMG-20260316-WA0003

करमाळा, प्रतिनिधी – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी प्रशांत शिंदे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अन्न व पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत परिषदेचे कार्याध्यक्ष मा. खा. पंकज भुजबळ यांच्या हस्ते प्रशांत शिंदे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

या मेळाव्या प्रसंगी ना. छगन भुजबळ यांनी नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन करताना महात्मा फुले समता परिषद ही राजकीय संघटना नसून ती सामाजिक परिवर्तन घडवणारी संघटना असल्याचे तसेच समतेच्या तत्वावरच समाजातील सर्व सामान्य बहुजन लोकांच्या हक्कांसाठी लढणे, हे नियुक्त पदाधिकारी यांच्याकडुन अपेक्षित असल्याचे सांगितले. अ.भा. महात्मा फुले समता परिषद कडून क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांची २०० वा जयंती सोहळा या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रमांनी साजरी केली जाणार असल्याचे कार्याध्यक्ष खा. समीर भुजबळ यांनी व्यक्त केले.

सोलापूर जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे यांच्या मार्गदर्शनाखाली ना. छगनरावजी भुजबळ यांचे समतेचे विचार करमाळा तालुक्यात तळागाळापर्यंत पोहोचुन संघटना लवकरात लवकर बांधणी करून काम प्रामाणिकपणे करणार असल्याची भावना यावेळी नुतन अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी मार्गदर्शक बबन रासकर, शहराध्यक्ष अमोल नाळे, दत्ता जाधव, शनी भुजबळ, विशाल बनकर, गणेश नाळे, अनिल नाळे, आण्णा शिंदे, विवेक अवसरे, गणेश जाधव आदी समता सैनिक उपस्थित होते.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!