करमाळा, विशाल परदेशी – करमाळा-पुणे रस्त्यावर करमाळा ते वीट दरम्यान असलेल्या सूर्या पॉइंट परिसरात मोठी आग लागल्याचे निदर्शनास आले आहे. घटनास्थळ वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याचा अंदाज असून याबाबत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. अमोल घाडगे यांच्या माहितीवरून वन विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे.

रविवारी रात्री दहाच्या सुमारास डॉ. घाडगे हे या रस्त्यावरून प्रवास करत होते. दरम्यान करमाळा ते वीट रस्त्यावर रोसेवाडी चढाच्या पुढे असलेल्या सूर्य पॉईंट परिसरात डाव्या बाजूला असलेल्या वनविभागाच्या वनक्षेत्रात मोठी आग लागल्याचे डॉ. घाडगे यांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही यंत्रणा दिसून न आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत तेज वार्ता प्रतिनिधीशी संपर्क करून याबाबतची फोटोसह माहिती दिली.

डॉ. घाडगे यांच्या माहितीवरून तेज वार्ता प्रतिनिधीने तात्काळ वन परिक्षेत्र अधिकारी (वन्य जीव) रोहीणी साळुंखे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून या घटनेबाबतची माहिती दिली असता त्यांनी त्वरित वन कर्मचाऱ्यांना पाहणी करण्यास पाठवले. पाहणीनंतर सदरची आग ही वनक्षेत्रात नसून खाजगी क्षेत्रात असल्याची माहिती साळुंखे यांनी दिली आहे.

.

.

.

.

