May 6, 2026
IMG-20260505-WA0057

करमाळा, प्रतिनिधी – बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने करमाळा शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी बुद्ध वंदना करून शांतता, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला.

या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे करमाळा तालुका संघचालक डॉ. श्रीराम परदेशी, तालुका कार्यवाह दत्ता मनसुके, तालुका सहकार्यवाह प्रवीण गायकवाड, बाळासाहेब कुंभार, संघर्ष दयाळ, नितीन कांबळे, पत्रकार जयंत दळवी, नरेंद्र ठाकूर, सुहास ओहोळ, सोनू , रितेश कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी बुद्धांच्या विचारांचे आचरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!