पुणे येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान
करमाळा, प्रतिनिधी – तत्पर व उत्कृष्ट सेवा आणि योग्य मार्गदर्शनामुळे करमाळा तालुक्यातील मोबाईल विश्वात अग्रेसर असलेल्या श्री बनशंकरी मोबाईल शॉपीला ग्राहकांच्या असलेल्या पसंतीची आणखी एक पोचपावती मिळाली आहे. पुणे येथे विव्हो कंपनीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बनशंकरी मोबाईल शॉपीचे प्रोप्रायटर बसवराज सोमनाथ चिवटे यांना २०२५-२६ या वर्षाचा टॉप सेलर पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.

ग्राहकांच्या मागणीसह बजेटनुसार मोबाईल हँडसेट सुचविण्यात बनशंकरी मोबाईल शॉपी चा पूर्वीपासूनच हातखंडा आहे. ग्राहकाची गरज, बजेट आणि माफक डाऊन पेमेंट व कमीत कमी व्याजदरात वित्त पुरवठा या तिन्ही गोष्टींचा योग्य सुवर्णमध्य साधत बनशंकरी मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल विक्री केली जाते. सुधारित फीचर्स नुसार भविष्यात लॉन्च होणाऱ्या हँडसेट बाबत ग्राहकांना कल्पना देऊन ॲडव्हान्स बुकिंग घेऊन ग्राहकांना मोबाईल उपलब्ध करून दिले जातात. मोबाईल विक्री वेळीही ग्राहकांना वेगवेगळ्या भेट वस्तूंची पर्वणी मिळत असल्याने तसेच विक्री पश्चात तत्पर सेवा लाभत असल्याने बनशंकरी मोबाईल शॉपी तालुक्यातील ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत आली आहे.

याच विश्वासामुळे गतवर्षीप्रमाणेच २०२५-२६ या वर्षातही श्री बनशंकरी मोबाईल शॉपीमधून विव्हो कंपनीचे सर्वाधिक मोबाईल विक्री करण्यात आले आहेत. यामुळे श्री बनशंकरी मोबाईल शॉपी विव्हो कंपनीच्या विव्हो टॉप सेलर या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. पुणे येथे आयोजित भव्य सोहळ्यात कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते श्री बनशंकरी मोबाईल शॉपीचे बसवराज चिवटे यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार आमच्या ग्राहकांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळेच मिळाला आहे. भविष्यातही ग्राहकांना उत्तम सेवा, आकर्षक ऑफर्स आणि नवीन तंत्रज्ञानाचे मोबाईल उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू.
-बसवराज सोमनाथ चिवटे,
प्रोप्रायटर, श्री बनशंकरी मोबाईल शॉपी, करमाळा.

या यशामुळे करमाळा तालुक्यातील ग्राहक आणि मोबाईल क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, श्री बनशंकरी मोबाईल शॉपीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

.

