June 12, 2026
IMG-20260529-WA0011

अभियंत्यासह जेसीबी ऑपरेटरला दमदाटी व शिवीगाळ

करमाळा, प्रतिनिधी – सरकार व कंत्राटदार यांच्या संयुक्त आर्थिक सहभागाने (HAM अंतर्गत) तालुक्यातील केम येथील रस्त्याचे सुरू असलेले काम दोघा जणांनी बंद पाडले आहे. संतश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज पालखीचा परतीचा मार्ग म्हणून हा रस्ता ओळखला जातो.

याबाबत मेसर्स एल. एन. मालवीय इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे प्राधिकरण अभियंता अनिलकुमार संभुनाथ तिवारी (रा. घोरपडी, पुणे) यांनी दि.२६/०५/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या कंपनीमार्फत केम हद्दीतील जमीन गट नं.७५, ७६/१, ७६/२ मधुन HAM अंतर्गत श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी परतीच्या मार्गाचे काम चालु आहे. दि.२२/०४/२६ रोजी केम येथील जुन्या पाण्याच्या टाकी जवळ रस्त्याचे काम सुरू असताना तेथे भरत महादेव तळेकर आणि लक्ष्मण महादेव तळेकर (दोघे रा. केम ता. करमाळा) यांनी ती जागा त्यांची असल्याचे सांगत रस्त्यात मोठे-मोठे दगड टाकून रस्त्याचे काम बंद पाडले होते. त्यानंतर दि.२६/०५/२६ रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी तिवारी हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत आणि करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणाचे अडवलेले काम चालु करण्यासाठी गेले असता भरत तळेकर आणि लक्ष्मण तळेकर या दोघांनी तेथे काम करत असलेल्या जेसीबी ऑपरेटर सचिन पोळ (रा. झरे ता. करमाळा) याला जेसीबी काढुन घेण्यासाठी शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी तहसिलदार ठोकडे यांनी समजावून देखील त्या दोघांनी न ऐकल्यामुळे तहसिलदार यांच्या लेखी पत्रानुसार फिर्यादी तिवारी यांनी भरत महादेव तळेकर आणि लक्ष्मण महादेव तळेकर यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसात तक्रार दिली आहे.

तिवारी यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी भरत महादेव तळेकर आणि लक्ष्मण महादेव तळेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला असून पोलीस हवालदार भाऊराव शेळके हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!